महाराष्ट्र शासनाकडून कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओ बाबतीत ,कोल्हापूर महापालिकेस दोन पर्यायांपैकी एक पर्याय अवलंब करण्याचा प्रस्ताव.--

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओच्या जागेबाबतीत गेले वर्षभर प्रलंबित असलेल्या प्रश्न, महाराष्ट्र शासनाकडून निकालात काढण्यात आला असून, कोल्हापूर महानगरपालिकेस दोन पर्यायांपैकी एका पर्यायाचा अवलंब करण्याचा प्रस्ताव दिला आहे. कोल्हापूरच्या वैभवशाली परंपरेत, चित्रपटसृष्टीचा साक्षीदार असलेला, जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा प्रश्न गेले वर्षभर शासन दरबारी, लोंबकळत पडला होता. महाराष्ट्र शासनाने नुकतेच याबाबतीत दोन प्रस्ताव महापालिकेस दिले असून ,पहिल्या पर्यायात स्टुडिओची संपूर्ण जागा ताब्यात घेऊन, विकासकाला पर्यायी जागा देण्यात यावी. दुसऱ्या पर्यायात जयप्रभा स्टुडिओची हेरिटेज वास्तू समावेश असणारी जागा सोडून, इतर राहिलेल्या जागेत संबंधित विकासकाला बांधकाम करण्यास परवानगी देण्यात यावी, असे शासनाने म्हटल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकार बैठकीत सांगितले.

 कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ हा कोल्हापूर शहरवासीयांचा व कलाकारांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असून ,सध्या प्रलंबित असलेला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ जागेचा प्रश्न मार्गी लावून, स्टुडिओच्या विकासाकरता निश्चितच प्रयत्न केले जातील अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात 3 ऑगस्ट 2023 रोजी, महाराष्ट्र राज्य नगर विकास खात्यामार्फत आदेशित केले असून, यात कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओच्या जागेबाबतीत महापालिकेस दोन पर्याय उपलब्ध करून देऊन त्यापैकी एका पर्यायाचा अवलंब करण्यास सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top