जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात विस्तारित म्हैशाळ योजनेसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद झाली असून, दुष्काळ हाच आपला खरा शत्रू मानून,शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहून,जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहू,अशी ग्वाही खासदार संजयकाका पाटील यांनी दिली. ते जत तालुक्यातील कुंभारी,धावडवाडी, हिवरे,डोरली, अंकले, बाज, बेळुंखी, डफळापूर, कुडनूर, शिंगणापूर,मिरवाड, जिरग्याळ, एकुंडी,वज्रवाड, गुगवाड, बसर्गी,बिळूर, साळमळगेवाडी,येळदरी या टंचाईसदृश्य भागातील गावांच्या दौऱ्याप्रसंगी बोलत होते.खासदार संजय काका पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच प्रत्यक्षात भेटी घेऊन सर्व गावांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शेतीचे पाणी योजना टंचाई परिस्थिती शाळा वीज वितरण व्यवस्था तसेच अन्य विकास कामाबद्दल अथवा अडीअडचणी बद्दल लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या व गावातील अनेक समस्यांचा निपटारा जागेवरच करण्याचा प्रयत्न केला.
आपल्या सांगली जिल्ह्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारने जलसंपदा विभागाच्या कामासाठी मोठी मदत केली. पश्चिम महाराष्ट्रमध्ये अनुशेषाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पाणी योजनांच्या व इतर विकास कामांसाठी निधीसाठी मोठी अडचण होती. त्यामुळे राज्याच्या तिजोरीतून जलसंपदा विभागासाठी निधी मिळण्यास काही अटी होत्या,त्यामुळे केंद्राकडे पाठपुरावा करून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रजी शेखावत यांनी शेतीच्या पाण्याच्या योजनेसाठी 2100 कोटी रुपये प्रधानमंत्री कृषीसिंचाई योजनेतून शेतीच्या पाण्यासाठी दिले तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही या योजनांना निधीसाठी जो राज्याचा हिस्सा होता त्यासाठी मदत केली.सध्या जत तालुक्यातील 65 गावांना विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी 1000 कोटी रुपयांची राज्य व केंद्र सरकार मार्फत तरतूद झाली असून, त्यातील प्रत्यक्षात कामे येत्या काही दिवसात सुरू होतील.ज्या गावांना पूर्वी म्हैशाळ योजनेतून उंचावर असल्यामुळे पाणी मिळाले नसेल,त्या गावातील उर्वरित भागांना विस्तारित म्हैशाळ योजनेतून पाणी शेतीचे पाणी देण्यासाठी तरतूद केली आहे. त्यामुळे संपूर्ण जत तालुका येत्या काही वर्षांमध्ये ओलिताखाली येणार आहे शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठीच आपले राजकारण समाजकारण असून सध्या असणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी हवालदिल न होता त्यांच्या पाठीमागे मी भक्कमपणे एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि आपल्यातीलच एक शेतकरी म्हणून उभा असेल,अशी ग्वाही खासदार संजयकाका पाटील यांनी दिली. तसेच येत्या दोन ते अडीच वर्षात पूर्ण विस्तारीत म्हैसाळ योजना पूर्ण करून 65 हजार एकर क्षेत्र जुनी म्हैसाळ योजना व विस्तारित 65 हजार एकरसाठी विस्तारित म्हैसाळ योजना असून त्यामुळे सर्व तालुका ओलिताखाली आल्यानंतर तालुका सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार आहे.
यावेळी खासदार संजय काका पाटील यांच्यासोबत जत विधानसभा भारतीय जनता पक्ष विधानसभा प्रमुख तमन्नागौडा रवी पाटील, कुंभारीचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर जाधव,जल संपदा विभागाचे सुप्रीटेंडन इंजिनिअर पाटोळे सर,जत प्रांत अधिकारी नष्टे सर,जत तहसीलदार बनसोडे साहेब, म्हैसाळ कार्यकारी अभियंता सचिन पवार सर आणि रोहित कोरे सर, जत गटविकास अधिकारी सलगर साहेब, MSCB हलनुर साहेब, जिल्हा मध्यवर्ती बँक चे संचालक मन्सूर खतीब, डफळापूर चे युवा नेते दिग्विजय चव्हाण,अंकले चे शंकर वगरे सर,तसेच सरपंच,उपसरपंच , तलाठी,तहसीलदार,सर्व विभागाचे अधिकारी,ग्रामस्थ , पदाधिकारी,उपस्थित होते.