जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मुंबईत इंडिया आघाडीची बैठक काल व आज होत असून,सर्व विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले आहेत.आगामी लोकसभेच्या निवडणुकीची शक्यता गृहीत धरून,भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एका समान कार्यक्रम आधारित एकत्र येण्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. काल 31ऑगस्ट 2023 व आज 1 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होत असून,पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव,बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव,जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, परवा मुंबईत दाखल झाले आहेत.काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी,काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हे काल सकाळी मुंबईत दाखल झाले,शिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन,बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार,झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आदी मुख्यमंत्री उपस्थित राहिले आहेत.
सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रीय राजकारणातील आव्हाने शिवाय भारतीय जनता पार्टी समोर तगडे आव्हान उभे करण्याच्या गोष्टीवर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. सर्वसाधारणपणे 28 विरोधी पक्षांचे 63 नेते हे ग्रँड हयात हॉटेलमध्ये आले असल्याने, हॉटेलच्या परिसरास कमालीच्या बंदोबस्ताचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मुंबईत असलेल्या ग्रँड हयात हॉटेलची व आसपासच्या परिसराची सूत्रे केंद्रीय राखीव सुरक्षा दलाने हाती घेतली असून, राज्यातील पोलीस प्रशासन यंत्रणा हाय मोडवर अलर्ट ठेवण्यात आलेली आहे. इंडिया आघाडीत समाविष्ट असलेल्या सर्व विरोधी पक्ष नेत्यांना काल संध्याकाळी, शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट)उद्धव ठाकरे यांनी स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. आज शुक्रवार दि .1 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडून स्नेहभोजन झाल्यानंतर, दुपारी 1:00 वाजता सर्व विरोधी पक्षीय नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. एकंदरीतच काल पासून सुरू झालेल्या मुंबईतल्या सर्व विरोधी पक्ष्यांच्या इंडिया आघाडीची बैठकीत विशेषत्वे करून ,एका समान कार्यक्रमावर आधारित कार्यक्रम राबवण्यावर चर्चा होऊन एकमत होणार आहे.