सांगली जिल्हा बंदला आज उस्फूर्त प्रतिसाद,जालन्यातील मराठा आंदोलकांच्यावर केलेल्या लाठीहल्ला प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी व आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी मराठा समाज बांधवांतर्फे विराट मोर्चा.!

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

जालना येथे मराठा समाज बांधव आंदोलकांच्यावर झालेल्या लाठी हल्ला प्रकरणी,कारवाई होण्यासाठी व आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी आज सांगली जिल्हा बंदचे आवाहन, मराठा समाज संघटनेच्या बांधवातर्फे करण्यात आले होते. आज सकाळी मराठा समाज बांधवांच्या तर्फे एक मोर्चा काढण्यात काढण्यात आला होता.सांगलीतील व्यापाऱ्यांनी,  नागरिकांनी व विविध संघटनांनी आजच्या बंद मध्ये आवश्यक सेवा सोडून,बंद मध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आले आहे.आजच्या मराठा समाज बांधवांच्या तर्फे सांगली जिल्हा बंद च्या आवाहनाला अनुसरून,सर्व व्यापारी असोसिएशन,व्यापारी महासंघ,रिक्षा चालक- मालक संघटना, राष्ट्रवादी रिक्षा संघटना,चेंबर ऑफ कॉमर्स,मार्केट यार्ड व्यापारी संघटना, भाजीपाला- फळ मार्केट संघटना, पानपट्टी असोसिएशन,कापड पेठ-सराफ पेठ- कुपवाड पेठ व्यापारी असोसिएशन, दत्त मारुती रोड व्यापारी असोसिएशन व मुस्लिम संघटनांचा बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग होता.

 आजच्या मराठा समाज बांधवांतर्फे निघालेल्या मोर्चामध्ये, शहर पानपट्टी असोसिएशन चे अजित सूर्यवंशी,रत्नाकर नांगरे, सांगली शहर व्यापारी असोसिएशनचे समीर शहा व सर्व पदाधिकारी,मुस्लिम ओबीसी संघटनेचे मिस्त्री,जोहे पन्हाळकर,इरफान मुल्ला,अंजल बाबा,इरफान शिकलगार, कय्युम पटवेगार, शिवप्रतिष्ठानचे सचिन देसाई, प्रकाश निकम, सचिन मोहिते,अमरजीत सावंत,शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे अध्यक्ष नितीन चौगुले,हॉटेल असोसिएशनचे लहू भडेकर, राष्ट्रवादी रिक्षा चालक-मालक संघटनेचे रामभाऊ पाटील,रिक्षा संघटनेचे महादेव पवार,चेंबर ऑफ कॉमर्स दयानंद,इमरान शेख,सुरेश टेंगले,व्यापारी असोसिएशनचे अनिल कवठेकर, सुरेश साखळकर,अमर डिडवळ,राजेंद्र पवार तसेच विविध शैक्षणिक संस्था व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सकाळी ठीक 10:00 वाजता निघालेल्या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता.आजचा एकंदरीत मराठा समाज संघटनेच्या बांधवांतर्फे आवाहन केलेला सांगली जिल्हा बंद पूर्णपणे यशस्वी झाला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top