जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
कोल्हापुरात हॉटेल सयाजी येथे झालेल्या चर्चासत्रात दीपप्रज्वलनप्रसंगी डॉ.अब्दुल सुलतान,डॉ.हलकर्णीकर,डी.वाय. पाटील शैक्षणिक संस्थांचे कुलगुरू डॉ.संजय पाटील,डॉ.नंदिता पालशेतकर,डॉ.राणी ठकार,डॉ.पद्मरेखा जिरगे व डॉ.आर.के.शर्मा.
कोल्हापूर, ता.२९ - रॉयल कॉलेज ऑफ ऑबस्टेट्रीशियन आणि गायनॅकॉलॉजिस्टच्या अध्यक्ष डॉ.राणी ठकार,युकेमधील प्रख्यात स्त्री रोगतज्ज्ञ डॉक्टर अब्दुल सुलतान व सुप्रसिद्ध आयव्हीएफ स्पेशालिस्ट डॉक्टर नंदिता पालशेतकर यांनी मातृत्व काळातील स्त्रियांच्या आरोग्य विषयीच्या विविध पैलूंवर मार्गदर्शनपर केले.
इसार - इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रोडक्शन यांच्यातर्फे पश्चिम महाराष्ट्रातील आयव्हीएफ क्षेत्रातील विविध मान्यवरांना विशेष पुरस्कार वितरणाचा सोहळा येथील हॉटेल सयाजी येथे पार पडला.रॉयल कॉलेज ऑफ ऑबस्टेट्रीशियन आणि गायनॅकॉलॉजिस्टचे अत्यंत मानाचे पद भूषविणाऱ्या डॉ.राणी ठकार व डी.वाय.पाटील ग्रुपचे संचालक डॉ.संजय पाटील यांच्या हस्ते आयव्हीएफ स्पेशालिस्टना पुरस्कार प्रदान करण्यात आला.इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रोडक्शनच्या अध्यक्ष डॉ.नंदिता पालशेतकर व कोल्हापूरमधील फर्टिलिटी स्पेशालिस्ट व महाराष्ट्र इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रोडक्शनच्या अध्यक्ष डॉ. पद्मरेखा जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ.डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज आणि कोल्हापूर ऑबस्टेट्रीशियन आणि गायनॅकॉलॉजिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.