जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
आज दि. 09.09.2023 रोजी 11.00 वा. ते 2.00 मुदतीत करवीर पो.ठाणे यांचे वतीने दि.19.08.2023 रोजी घेण्यात आलेल्या भव्य निबंध व चित्रकला स्पर्धेमध्ये 152 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता,सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ करवीर पोलीस ठाणे येथे घेण्यात आला, एकूण 20 नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र,स्कूल बॅग,शैक्षणिक साहित्य द कॉंझर्वेशन फाऊंडेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने देऊन सन्मानित करण्यात आले.
निबंध स्पर्धा लहान गट 5 वी ते 7 वी.-
1. श्रावणी नारायण सातपुते विद्या मंदिर वाकरे.
2. श्रुती विकास चौगुले शिये हायस्कूल शिये.
3. तनवी सुनील पाटील विद्यामंदिर वाकरे.
उत्तेजनार्थ.-
1.श्रेया अजित पाटील ग.गो.जाधव केर्ली.
2.मृणाल संजय खाडे सांगरूळ हायस्कूल.
मोठा गट 8 वी ते 10 वी.-
1. क्रांती किरण झांजगे हणमंतवाडी हायस्कूल.
2. अथर्व धनाजी पाटील शिये स्कूल.
3. वेदांत निवास पाटील श्री हायस्कूल.
उत्तेजनार्थ.-
1.श्रुतिका उमाजी फाटक माध्यमिक विद्यामंदिर सावर्डे सडोली दुमाला.
2.पृथ्वीराज सागर कोळी ग.गो.जाधव हायस्कूल केर्ली.
चित्रकला स्पर्धा लहान गट 5 वी 7 वी.-
1.युवराज विठ्ठल नाईक दादासाहेब अ.मगदूम हायस्कूल
2.अथर्व अनिल पोतदार पद्मश्री डॉ. ग.गो. जाधव हायस्कूल केर्ली.
3.जानवी एकनाथ देसाई कै. श्रीमती बाळाबाई कृष्णात पाटील हायस्कूल
उत्तेजनार्थ-
1.सृष्टी सरदार पाटील -कै.ज्ञानू धोंडी पाटील हायस्कूल भुये.
2.स्नेहल अशोक सुतार- शिये हायस्कूल शिये.
चित्रकला मोठा गट 8 वी ते 10 वी.-
1.दीक्षा संतोष रंदील-शिये हायस्कूल शिये.
2.तन्मय संतोष पाटील- न्यू माध्यमिक विद्यालय उंचगाव.
3.प्रांजल सूरजकुमार पवार लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल मोरेवाडी
उत्तेजनार्थ-
1.विवेक अमर पाटील -कै.ज्ञानू धोंडी पाटील, हायस्कूल भुये
2.अंजली कृष्णात शिंदे - न्यू इंग्लिश स्कूल,खुपिरे.
सदर बक्षीस वितरण हे अन्नपूर्णा सिंह परि.सहा.पो.अधीक्षक यांच्या हस्ते पार पडले, पोलीस मित्र,परीक्षक यांचा देखील सत्कार करण्यात आला,यावेळी करवीर पोलीस ठाणे कडील पोलीस निरीक्षक श्री अरविंद काळे,मोटर परिवहन विभागाकडील पोलीस निरीक्षक श्री.रजपूत,सहा.पोलीस निरीक्षक श्री.करे,पोलीस उपनिरीक्षक श्री.जालिंदर जाधव,श्री. निवास पवार,गोपनीय अंमलदार अविनाश पोवार,सुहास पोवार, सचिन जाधव यांनी चांगले नियोजन केले होते.
तत्पूर्वी पोलीस दलाविषयी,पोलीस ठाण्याचे कामकाजांविषयी, सदर विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना विभागवार माहिती सांगून नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षण,घ्यावयाची खबरदारी दक्षता तसेच पोलीस व जनता संबंध वाढीस लागण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पोलीस ठाणे कडील अधिकारी अंमलदार, विद्यार्थी, शिक्षक,पालक हजर होते.त्यानंतर अन्नपूर्णा सिंह सहा.परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक यांचा करवीर पोलीस ठाणे येथील कालावधी पूर्ण झाल्याने त्यांचा देखील निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.सर्व अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी आपली मनोगते व्यक्त केली.