जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
नाशिक मध्ये काल अनंत चतुर्दशीच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील DJ लेसर शोच्या मुळे,गणेश भक्तांना अंधत्व आल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.नाशिक मधील एक प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञांकडे,एक विशीतला तरुण काल अचानक दिसायला कमी झाल्यामुळे आला होता.प्राथमिक तपासणीत त्याची नजर अत्यंत कमजोर झाल्याचे नेत्र तज्ञांच्या लक्षात आले.थोड्याच वेळात डोळ्याचे प्रेशर तपासून नेत्र पाटलाची तपासणी केली असता,नेत्र पटलावर रक्त साखळलेले व नेत्र पटलावर भाजलेला सारख्या जखमा आढळल्या.नेत्र तज्ञांनी त्या अंधत्व आलेल्या रुग्णाकडे चौकशी केली असता तो रुग्ण, कालच्या अनंत चतुर्दशीच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत,DJ च्या लेसर शो वर नाचला असल्याचे समजले. नेत्र तज्ञांनी त्या रुग्णाच्या डोळ्याच्या अंतिम तपासणीसाठी, रेटिनाचा OCT स्कॅन करून, निदान कन्फर्म केले.पुढे दोन तासानंतर आणखी 2 रुग्ण त्या नेत्र तज्ञ डॉक्टरांच्या कडे, डोळ्यांना अंधत्व आल्यामुळे तपासणीसाठी आले.मग मात्र नेत्र तज्ञ डॉक्टरांनी,नेत्ररोग संघटनेकडे चौकशी केली असता, कालच्या अनंत चतुर्दशीच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत, DJ लेसर शो मुळे,5 तरुणांच्या डोळ्यांना अंधत्व आल्याचे स्पष्ट झाले आहे.कदाचित हा आकडा जास्त असण्याची शक्यता वाटत आहे.रुग्णांच्या नेत्र पटलावर DJ लेसर शो मुळे, रेटिना बर्न झाल्याचे हा प्रथमच प्रकार बघितल्याचे,नेत्र तज्ञांनी सांगितले आहे.शिवाय हा एक भलताच प्रकार असल्याचे त्यांना जाणवले आहे.
