जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापुरात दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी,नवरात्रोत्सवानिमित्त दि.15 ते 24 ऑक्टोबर 2023 पर्यंत दसरा महोत्सव साजरा करण्यात येणार असून, दि.16 ऑक्टोबर 2023 रोजी पारंपारिक वेशभूषा दिन,जिल्ह्यातील सर्व शासकीय,खाजगी, शैक्षणिक कार्यालयांमध्ये साजरा करण्यात येणार आहे.
कोल्हापुरातील दसरा महोत्सव हा देश विदेशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला असून,राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने हा कोल्हापुरातील दसरा महोत्सव,देशाच्या आणि विदेशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी सध्या शासन व्यवस्था गतिमान केली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय- खाजगी कार्यालयासकट सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये, दि.16 ऑक्टोबर 2023 रोजी पारंपारिक वेशभूषा दिन साजरा करण्यात येणार असून,शिक्षण विभागाकडून पारंपारिक वेशभूषा दिन साजरा करण्यासाठी,योग्य तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे.
दि.16 ऑक्टोबर 2023 वार सोमवार रोजी,आपल्या पारंपारिक वेशभूषामध्ये,सर्व शासकीय कार्यालय,खाजगी कार्यालय व शाळांच्या संस्थांमध्ये,सर्व अधिकारी वर्ग,कर्मचारी वर्ग,शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्ग यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.कोल्हापुरातील शाही दसरा 2023 हा,राज्य शासनाने राज्याचा महोत्सव म्हणून साजरा करण्याचे ठरवले असून,त्या महोत्सवादरम्यान विविध कार्यक्रम स्पर्धा सांस्कृतिक विभागाने मोठ्या प्रमाणात आयोजन केले असून,कोल्हापूर शहरवायांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेऊन उपस्थिती रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. एकंदरीतच दि.15 ते 24 ऑक्टोबर 2023 पर्यंत साजरा होणारा कोल्हापूरचा शाही दसरा 2023 महोत्सव हा,अतिशय उत्साहात व आनंदात साजरा होणार असल्याचे चित्र दिसत आहे.