जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
गोवा येथे सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र 94 पदकांसह आघाडीच्या शिखरावर असून,आज रविवारी पिंच्याक,सिल्याट,जलतरण आणि वेटलिफ्टिंग आदि प्रकारात पदके जिंकली आहेत.महाराष्ट्राने आज रविवारी 1 सुवर्ण,4 रौप्य,2 कांस्यपदकांसह 7 पदकांची भर घालत, महाराष्ट्रत राज्याच्या खात्यावर 41 सुवर्ण, 25 रौप्य, 28 कांस्य अशी एकूण 94 पदकांची प्राप्ती केली आहे.
पिंच्याक,सिल्याट क्रीडा प्रकारात भक्ती किल्लेदार ने सुवर्णपदक,तसेच अनुज सरनाईक,ओमकार अभंग यांनी रौप्य पदके प्राप्त केली आहेत.महाराष्ट्र राज्याच्या जलतरणपटुंनी पहिल्याच दिवशी,2 रौप्य पदकावर व 1 कांस्यपदकांवर गवसणी घातली असून,ही एक प्रकारे सुरुवातीसच आत्मविश्वासपूर्वक कामगिरी आहे. वेटलिफ्टिंग मध्ये अखेरचा दिवशी महिलांच्या 87 किलो वजनी गटात,महाराष्ट्राच्या योगिता खेडकर ने कांस्यपदक प्राप्त केले आहे.
गोवा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र 94 पदकांसह पदक तक्त्यांच्या संख्येत,उच्च स्थानी पोहोचला आहे.महाराष्ट्र राज्यातील खेळाडूं हे एक प्रकारे,राज्याच्या क्रीडा क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करत असून,राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सध्या आघाडी प्राप्त केली आहे.महाराष्ट्र राज्यातील विविध क्रीडा प्रकारात खेळाडू करत असलेल्या कामगिरीकडे,महाराष्ट्र राज्यातील क्रीडा रसिकांचे लक्ष लागले आहे.