जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
चांदोली धरण पाणलोट क्षेत्र व आसपासच्या परिसरात आज ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून,धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील निवळी,धनगरवाडा आदी ठिकाणी अनुक्रमे 138 मिमी 161 मिमी व धरण पाणलोट क्षेत्रात 89 मिमी पावसाची नोंद झाली आहे.आज पर्यंतचा चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस हा विक्रमी असून,धरणातून सध्या होत असलेला विसर्ग 9400 क्यूसेक चालू आहे.धरणाच्या वक्र दरवाजातून 8000 क्युसेक व विद्युत जनित्रामधून 1400 क्यूसेक असा एकूण 9400 क्यूसेक पाण्याचा विसर्ग धरणाच्या मधून चालू आहे.
पाटबंधारे विभागाने दिलेल्या निवेदनानुसार वारणा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होणार असून,नदीकाठच्या गावांना व परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.आज सकाळपासूनच चांदोली धरणाच्या परिसरात मुसळधार पावसाने सुरुवात केली होती.सोनवडे,आरळा,मणदुर आदी गावात मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.आजच्या झालेल्या पावसामुळे नदी-नाले-ओढे भरून वाहत असून शेतामध्ये सुद्धा पाणीच पाणी झाले आहे.वारणा धरण व्यवस्थापनाने सुद्धा नदीकाठच्या व आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.