जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यातील तासगाव- कवठेमंकाळ विधानसभा क्षेत्रामध्ये आज,महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला स्वच्छांजली अभियान अंतर्गत श्रमदान व स्वच्छता अभियान राबवण्यात आले.स्वच्छता हेच सेवेचे साधन आहे,या विचारावरच मार्गक्रमण केले तर हीच खरी महात्मा गांधीजींना आदरांजली ठरेल,असे मत खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केले.ते तासगाव येथे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व जे. पी.नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला,संपूर्ण देशभरात स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवून,महात्मा गांधी यांना स्वच्छांजली वाहण्यात आली.या मोहिमे अंतर्गत तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा क्षेत्रामध्ये श्रमदान व स्वच्छता अभियान राबविण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.खासदार संजय काका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा क्षेत्रासोबतच,संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये हे अभियान राबविण्यात आले आहे.या कार्यक्रमास खासदार संजय काका पाटील व युवा नेते तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा प्रमुख प्रभाकरबाबा पाटील हे उपस्थित होते.
यावेळी खासदार संजयकाका म्हणाले की,महात्मा गांधीजींनी संपूर्ण देशाला अहिंसा आणि स्वच्छतेचा मार्ग दाखवला.त्या मार्गावर आणि तत्वावरच आपल्या देशाची स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्य नंतर जडणघडण झाली आहे.तीन वर्षांपूर्वी कोरोना उद्भवलेल्या महामारीमुळे, संपूर्ण जगात लोकांच्या आरोग्याची मोठ्या प्रमाणात काळजी घेणे गरजेचे बनले आहे.त्यात प्रामुख्याने आपल्या देशामध्ये स्वच्छतेसाठी अनन्य साधारण महत्व आहे.सर्व आजार व रोगराई या अस्वच्छतेमुळे उदभवतात.त्यावर उपाय म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी,जगावर ओढवलेल्या कोरोना महामारीच्या संकटाच्या अगोदरच स्वच्छता अभियान देशभर राबवून, लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे.त्यात सातत्य ठेवण्यासाठीच महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला, स्वच्छंजली अभियान देशभर राबविण्यात येत आहे.आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघात ही स्वच्छांजली अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.लोकांनी वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व द्यावे. जेणेकरून स्वतःच्या आरोग्याबरोबरच सार्वजनिक आरोग्य ही चांगले राहणे गरजेचे आहे.आपणही सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखून,राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना स्वच्छांजली अर्पित करावी,असे आवाहन शेवटी खासदार संजयकाका पाटील यांनी केले.
यावेळी युवा नेते प्रभाकरबाबा पाटील यांच्यासह तासगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील भाजप माजी शहराध्यक्ष माणिक काका जाधव,भाजप तासगाव तालुका अध्यक्ष सुनील भाऊ जाधव,भाजप तासगाव शहराध्यक्ष हणमंत काका पाटील,माजी नगराध्यक्ष जाफर भाई मुजावर, माजी नगरसेवक तथा माजी भाजप युवामोर्च्या तालुका अध्यक्ष दिग्विजय भैय्या पाटील,माजी नगराध्यक्ष अविनाश काका पाटील,माजी नगरसेवक संभाजी गावडे,युवानेते रोहन भैय्या कांबळे,युवानेते साहिल भैय्या एकुंडे,युवानेते उमेश भाऊ गावडे,संजय लुगडे,दिपक अमृतसागर,राहुल सोनवणे,व तासगाव तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.