-जिल्हाधिकाऱ्यांकडून सीपीआरची पाहणी.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयांना भेटी देण्याच्या सूचना दिल्या होत्या.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रेखावार यांनी सीपीआरमधील विविध विभागांची व वॉर्डची पाहणी केली.यावेळी त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची स्वच्छता,रुग्णालयाकडून दिल्या जाणाऱ्या आरोग्य विषयक सेवा - सुविधा,औषधसाठा तसेच यंत्रसामुग्रीची माहिती घेतली. तसेच प्रसृती विभाग,नवजात शिशु,अतिदक्षता विभागासह विविध विभागांना भेटी देवून त्यांनी पाहणी केली. सीपीआरमध्ये उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही नागरिकांना औषधोपचाराअभावी परत पाठवू नये.तपासणीसाठी येणाऱ्या व दाखल रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या सूचना करुन सतर्क राहण्याचे आदेश त्यांनी दिले.
सीपीआर अंतर्गत आरोग्य केंद्रातील औषधसाठा पुरेसा असल्याची खात्री करा,औषधसाठा वेळेत उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही गतीने करा.औषधसाठ्याची माहिती पोर्टलवर वेळोवेळी अपलोड करा. येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचीही आस्थेने चौकशी करा.त्याचबरोबर रुग्णालय व रुग्णालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवा,अशा सूचनाही जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिल्या.