जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील मुंबईमध्ये स्वाईन फ्लू सदृश्य आजार ग्रस्त लोकांची संख्या वाढली असल्याचे,बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या साप्ताहिक अहवालात नमूद असल्याचे दिसत आहे. गेल्या20-25 दिवसात 51 रुग्णांची नोंद झाली असून,सप्टेंबर महिन्यातील रुग्णसंख्या 18 इतकी होती.मुंबई महापालिकेने केलेल्या अहवालानुसार मुंबई शहरातील नागरिकांनी,बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर,आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वारंवार वापर करावा,वारंवार हात धुवावेत,गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेने आजमीतीस जवळपास 8 लाख 55 हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण केल्या असून,जवळपास 42 लाख 75 हजार नागरिकांची तपासणी केली आहे.मुंबई महापालिकेने स्वाईन फ्लू सदृश्य आजार ग्रस्त रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून योग्य त्या खबरदारीच्या सूचना नागरिकांना दिल्या असून,खबरदारीच्या उपायोजना योजण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईमध्ये मात्र डेंगू व मलेरियाच्या आजारग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून आले आहे,ही एक जमेची बाजू म्हणावी लागेल.महाराष्ट्र राज्यात पण थंडी,खोकला, ताप आदी आजाराने बऱ्याच जिल्ह्यांमध्ये संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे.राज्यातील स्थानिक जिल्हा प्रशासनाने,योग्य त्या खबरदारीच्या उपायोजनासहित सर्वेक्षण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.