जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
देशातील केंद्र सरकारने कांद्याचे दर बाजारात स्थिर ठेवण्यासाठी,किरकोळ बाजारात 1 लाख टन कांदा आणण्याचा निर्णय घेतला असून,त्यामुळे कांद्याचे दर स्थिर राहण्यास फार मोठी मदत होणार आहे.केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने आज घेतलेल्या निर्णयानुसार 1 लाख टन कांदा, किरकोळ बाजारात आणण्यात येणार आहे,अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी आज नवी दिल्ली येथे दिली.
केंद्र सरकारने किरकोळ बाजारात 1 लाख टन कांदा आणण्याचा निर्णय अधिक कार्यक्षमतेने घेतला असून,त्यामुळे बाजारातील भाव स्थिर राहण्यास फार मोठी मदत होणार आहे.मोठ्या बाजारपेठेपेक्षा पण किरकोळ बाजारात कांद्याचे भाव स्थिर राखण्यासाठी हस्तक्षेप केला तर,त्याचा परिणाम ग्राहकांच्या हिताचा ठरतो,हे केंद्र सरकारच्या लक्षात आले असून,यासाठी केंद्र सरकारने देशभरातील सर्व किरकोळ बाजारपेठेवर लक्ष ठेवून,1 लाख टन कांदा किरकोळ बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.देशातील सध्याच्या परिस्थितीत कांद्याचे दर ग्राहकांच्या आवाक्या बाहेर गेल्याने, केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असून,ग्राहकांच्या हितासाठी किरकोळ बाजारात 1 लाख दोन कांदा आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.