- पहिल्याच निवडणुकीत पक्षाला मिळाला मोठा विजय.
- कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून साखर पेढे गुलालाची उधळण करत जल्लोषात आनंदोत्सव.
कोल्हापूर : ("जनप्रतिसाद न्यूज"-विशेष प्रतिनिधी).
महाराष्ट्र राज्यामध्ये नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी झाली या निवडणुकीत भारत राष्ट्र समिती या पक्षाने पदार्पणातच खाते उघडत 18 ग्रामपंचायतींवर विजय मिळविला. पक्षाने राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकविल्याबद्दल कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी ऐतिहासिक दसरा चौकात गुलालची उधळण करत साखर पेढे वाटून जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या त्यामध्ये महाराष्ट्रतील प्रस्थापित पक्षानीं मोठ्या ताकतीने निवडणूक लढवली या ताकदीच्या जोरावर त्यांनी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळवले मात्र,पहिल्याच निवडणुकीत बीआरएस पक्षाने 18 ग्रामपंचायतींवर विजयाचा झेंडा फडकवून प्रस्थापित पक्षांना एक प्रकारे धक्का दिला आहे.महाराष्ट्रात नव्याने पदार्पण केलेल्या के.चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने काही जिल्हयात जनमत आजमावण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर निवडणुका लढविल्या. त्यामध्ये पक्षाला यश येऊन महाराष्ट्रात 18 ग्रामपंचायतीवर भारत राष्ट्र समिती पक्षाचा विजयी झेंडा लावला.ग्रामपंचायत सदस्य म्हणून सुद्धा अनेक लोक निवडून आलेले आहेत.त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातून धोंडेवाडी ता.करवीर मधुन पांडुरंग नलावडे हे निवडून येवून पक्षाचे खाते उघडले आहे.त्या सर्वांचं सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
पक्षाच्या पदार्पण नंतर ह्या पहिल्याच निवडणुका झाल्या.त्यामध्ये इतके यश मिळाले याचा अर्थ असा आहे की,महाराष्ट्रतील जनता के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला कौल दिला आहे.जर पक्षाने महाराष्ट्रतील सर्व ग्रामपंचायती लढविल्या असत्या तर नक्कीच वेगळं चित्र दिसणार होत.यात शंका नाही.यावरून लक्षात येते की येणाऱ्या लोकंसभा,विधानसभा या निवडणुकीत महाराष्ट्रतील जनता के.चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाला साथ देऊन महाराष्ट्रात नक्कीच परिवर्तन होईल यात शंका नाही.पक्षाने ग्रामपंचायतीचा माध्यमातून चांगली सुरुवात केली त्यामूळे कोल्हापूर जिल्ह्यांतील सर्व पदाधिकारी यांना अत्यंत आनंद झाला. तो आनंद सर्वाबरोबर व्यक्त करावा म्हणून आज दसरा चौक कोल्हापूर येथे साखर वाटून फटाके लावून,जोरदार घोषणा देत गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला.
यावेळी कोल्हापूर जिल्हा समन्वयक दिव्याताई मगदुम,कोल्हापूर उत्तर समन्वयक विक्रमसिंह जरग,दक्षिणचे समन्वयक संग्राम जाधव,चंदगड समन्वयक विनोद नाईक,करवीर समन्वयक दिलीप चव्हाण,शाहूवाडी समन्वयक भीमराव पाटील,राकेश चंद्रकुडे,राजश्री पाटील,गीतांजली पाटील,प्रदीप नंदिवले व शिरोली दुमाला,पासर्डे, प्रयाग चिखली,आरे व कुरुकली गावातील दिव्याताई यांच्या छत्रपती शासन शाखेच्या महिला उपस्थित होत्या.