पंढरपूर येथे सांगलीच्या निर्धार फाउंडेशनच्या वतीने,"स्वच्छता वारी,पंढरपूर विठ्ठलाच्या दारी",चंद्रभागा नदीच्या काठावर,जवळपास 2 टन कचरा संकलनाचे श्रमदान.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

अलिकडच्या काळात तरूणाई वेगवेगळ्या सहली करण्यात गुंग असतानाच,कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मंदिर परिसरातील चंद्रभागेच्यातीरी,सांगलीतील तरूणाई निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर यांच्या पुढाकाराने आज रविवारी संपूर्ण दिवस,स्वच्छता मोहीम राबविण्यात व्यस्त होती.जवळपास दोन टन कचरा संकलन करून संपूर्ण एक परिसर स्वच्छ करण्यात आला.

सांगली शहरांमध्ये तरुणांचं संघटन करून,त्यांचा चांगल्या कामासाठी उपयोग करीत गेली 2000 दिवस झाले.शहरातील स्वच्छता व सुशोभीकरण करणारी टीम म्हणजे निर्धार फौंडेशन.राकेश दड्डणावर या तरूणाच्या पुढाकाराने ही टीम काम करीत असून,नुकतेचं या टीमची वर्ल्ड रेकॉर्ड कडूनही दखल घेण्यात आलेली आहे.

आषाढी व कार्तिकी एकादशी निमित्त,महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूर येथे दाखल होत असतात.यामध्ये अस्वच्छतेचा मोठा प्रश्न होत असतो म्हणून,निर्धार फौंडेशन कडून दरवर्षी,वारीनंतर पंढरपूर येथे स्वच्छतावारीच्या माध्यमातून श्रमदान करण्यात येते.रविवार सकाळी शहीद अशोक कामटे चौकात शहीदांना अभिवादन करून,यंदाच्या स्वच्छता वारीस सुरूवात करण्यात आली होती‌.यावेळी अँड अमित शिंदे व भारत जाधव यांनी उपस्थित राहून वारीस शुभेच्छा दिल्या.   

राकेश दड्डणावर म्हणाले की,आपल्या महाराष्ट्राला मोठा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे.राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरीबांधव पंढरपूर येथे दाखल होत असतात.पंढरपूर व श्री विठ्ठलाशी त्यांचे भावनिक नातं आहे.यामुळेच पंढरपूर शहरात स्वच्छता अभियान राबवून,राज्यातील लाखो वारकरी बांधवांमध्ये जनजागृती करण्याचा आमचा मानस आहे.

स्वच्छता वारीसाठी सर्वमंगल हॉस्पिटल - जेवण, क्रीडाई सांगली - बस, उत्तम आरगे - टी शर्ट, सुहास पाटील-पद्माकार जगदाळे - नाष्टा. आदिकडून सहकार्य मिळाले.अनिल अंकलखोपे,वसंत भोसले,संदेश खोत,रोहीत मोरे,ज्ञानदेव सुतार,मनोज नाटेकर आदिंसह स्वच्छतादूतांनी वारीत सहभाग नोंदविला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top