जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
कोल्हापुरातील महालक्ष्मी आणि ज्योतिबा देवालयात आता भक्त भाविकांच्या सुरक्षेसाठी, हायटेक, नेटवर्क जामर व फेस डिटेक्शन यंत्रणा उभारण्यात येणार असून,अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याने यंत्रणा सुसज्ज करण्यात येत असल्याचे प्रतिज्ञापत्र,मंदिर समितीने हायकोर्टात सादर केले आहे. कोल्हापुरातील महालक्ष्मी व ज्योतिबा देवालयात,भक्त भाविकांच्या सुरक्षेसाठी जवळपास 107 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, विमानतळाप्रमाणेच भक्त भाविकांच्या सामानांची तसेच मंदिरात येणाऱ्या सर्वांची तपासणी करण्यात येत आहे.अर्थातच कोल्हापुरातील महालक्ष्मी व ज्योतिबा मंदिर परिसरातील चोऱ्यांच्या प्रमाणातही,मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे,देवस्थान समितीच्या वतीने प्रतिज्ञापत्रकात नमूद करण्यात आले आहे.
मंदिर समितीने ठरवलेल्या उपाययोजनानुसार भक्त भाविकांना सुरक्षा देण्यासाठी,प्रशिक्षित शस्त्रधारी रक्षकांच्या नेमणुकीस,सध्या न्यायालयाची स्थगिती असून,ही स्थगिती उठवण्याची विनंती मंदिर समितीने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयास केली आहे.मात्र सध्याच्या परिस्थितीत हायकोर्टने 20 डिसेंबर 2023 पर्यंत सुनावणी तहकूब करून,सध्याची स्थगिती कायम ठेवली आहे.एकंदरीतच मंदिर समितीने केलेल्या सुरक्षेच्या दृष्टीच्या उपाययोजना,कोल्हापुरातील महालक्ष्मी व ज्योतिबा मंदिरात येणाऱ्या भक्त भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय योग्य असून,सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महालक्ष्मी व ज्योतिबा मंदिर ही दोन्हीही देवालये आता,यापुढे सुरक्षेच्या उपाययोजनासहित सुसज्ज असणार आहेत.