जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
युरोपियन बाजारपेठेत भारतातील केळींची निर्यात वाढावी म्हणून आज,अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणामार्फत, केळीच्या चाचणीच्या आवश्यक असलेल्या फेरीसाठी, बारामतीहून युरोपकडे केळी रवाना झाली आहेत.राज्यातील बारामतीतून केळीच्या गोदामातून सुमारे 20 मेट्रिक टन केळीचा कंटेनर,जेएनपीटी बंदराकडे रवाना झाला आहे.उद्या उरण येथील जेएनपीटी बंदरातून युरोपला केळी रवाना होणार असून,सुमारे 21 दिवसांनी हा कंटेनर नेदरलँड येथे पोहोचेल.
युरोपमधील अँमस्टरडेम शहरातील असलेल्या एका सुपर मार्केटमध्ये,भारतातील बारामतीहून पाठवलेली केळी वितरित केली जाणार आहेत.एकंदरीत युरोपियन बाजारपेठेत केळीची निर्यात वाढावी म्हणून,अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने फार मोठे पाऊल उचलले असून,भारतीय केळींचे उत्पादन वाढवून,युरोपीयन बाजारपेठेत केळींना मागणी मोठ्या प्रमाणात व्हावी व केळींची निर्यात वाढावी हा यामागे उद्देश आहे.