जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील पारंपारिक पूज्य फरांडे बाबा यांच्या भाकणुकीनुसार,राजकारणात प्रचंड अस्वस्थता वाढून,महागाई वाढेल असे संकेत प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र,आंध्र प्रदेश,कर्नाटक या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पट्टणकोडोली तीर्थक्षेत्री,श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला कालपासून सुरुवात,मोठ्या भक्तिमय, आनंदमय,उत्साहाच्या वातावरणात सुरुवात झाली असून, देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भक्त -भावीक काल पट्टणकोडोली दाखल झाले आहेत.
पट्टणकोडोली यात्रेत रितीदिवाजानुसार खारीक,खोबरे व भंडाऱ्याची उधळण केली जात असून,भंडाऱ्याच्या उधळणीमुळे पट्टणकोडोली तीर्थक्षेत्रास जणू सोन्याची लकाकी आल्याचे दिसत आहे.कोल्हापुरातील पट्टणकोडोली यात्रेत परंपरेनुसार पूज्य फरांडे बाबा यांनी केलेल्या आज दुपारच्या सत्रातील भाकणुकीत,राजकारणात प्रचंड अस्वस्थता वाढून, महागाई महागाई वाढण्याचे संकेत मिळाले आहेत.
सध्याच्या राजकारणात गोंधळ वाढून,राजकारणातील वातावरणात अस्वस्थता राहून,उलथापालथ होईल.भगव्याचे राज्य येईल.बळीराजाला सुखाचे दिवस येतील.महागाईचा कहर होईल.देशात समाननागरी कायद्याच्या दृष्टीने आश्वासक वाटचाल चालू होईल.भारत देश महासत्ता बनेल.भारतीय संशोधनाचे जगात कौतुक होऊन,भारत देश महासत्ता बनण्याच्या दृष्टीने पुढे जाईल असे व इतर भाकणुकीतील आशय होते.
देशातील कानाकोपऱ्यातून भक्त भावीक पट्टणकोडोलीत दाखल होत असून,जिकडे पाहावे तिकडे खारीक,खोबरे व भंडाऱ्याची मुक्त उधळण होत आहे.एकंदरीत अतिशय उत्साहाजनक वातावरणात व आनंदात काल पट्टणकोडोली यात्रेचा प्रारंभ सुरू झाला आहे.