शारीरिक आरोग्यात कफ,सर्दी, खोकला आणि ताप दूर करण्यासाठी, थंडीत प्या खास लसणाचा चहा,जाणून घ्या कसा बनवाल...!
आरोग्य भाग- 9
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की,लसणाचा चहा हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी अधिक फायदेशीर असतो.आणि याने ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहतं.तसेच याचा फायदा वजन कमी करण्यासही केला जातो.असे मानले जाते की,याने मेटाबॉलिज्म आणि पचनक्रिया मजबूत राहण्यासही मदत होते.एका रिसर्चनुसार,लसूण व्हजायनल इन्फेक्शन, माउथ अल्सर आणि पोटाच्या कॅन्सरवरही चांगला मानला जातो.
लसणाचा चहा करण्याची पद्धत...
3 ते 4 लसणाच्या कळ्या दोन कप उकडत्या पाण्यात टाका. त्यात लिंबू आणि मध टाकून 5 मिनिटे उकडू द्या.तुमचा चहा तयार आहे.हा चहा तुम्ही सेवन करा.
सदरहू लेख हा कुमार चोप्रा व सुनील इनामदार यांच्या संग्रहातून,आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.