जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे,अंदाजे जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.राज्यात काही ठिकाणी गारपिटीमुळे द्राक्ष,कलिंगड,केळी या फळ पिकांसह भाजीपाल्यांचे देखील फार मोठ्या प्रमाणात नुकसान काम झाले आहे.राज्यात गेले 2 दिवस अवकाळी पावसामुळे थैमान घातले असून,वादळी पाऊस व गारपिटाचा देखील केळीच्या पिकाला मोठा नुकसानीचा झटका बसला आहे.
शासनाच्या कृषी विभागाकडे असलेल्या माहितीनुसार, नाशिक व बुलढाणा जिल्ह्यात हजारो हेक्टर वरील शेतीमालाचे नुकसान झाले आहे.राज्यातील अहमदनगर,जळगाव,धुळे, नंदुरबार येथे देखील पिकांची फार मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे असे वृत्त आहे.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे, अशा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना तत्काल नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून,त्याप्रमाणे योग्य ती मदत निश्चित शासनामार्फत करण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
जळगाव मध्ये केळीच्या भागांना फार मोठा फटका बसले असल्याचे वृत्त आहे.महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे 2 दिवस सरकारी कार्यालय बंद असल्यामुळे होऊ शकले नाहीत. लवकरच राज्य शासनाला राज्यातील ठिकठिकाणी झालेल्या नुकसानी विषयी माहिती,अहवालाद्वारे मिळू शकेल. एकंदरीतच शेतकऱ्यांचे राज्यातील गेले 2 दिवस अवकाळी पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान,भरून येण्याजोगे नसल्याचे दिसत आहे.