जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती ओढावली असून,यासंदर्भात लवकरच दुष्काळी मंडळाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज कुलाबा येथे झालेल्या "पालावरची दिवाळी" या कार्यक्रमानंतर,पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाराष्ट्र राज्यातील सद्य परिस्थितीतील अनेक जिल्ह्यात ओढवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे,लवकरच वेगवेगळ्या निकषांवर आधारित मंडळाच्या घोषणेसंबंधी,मंत्रिमंडळ उपसमिती लवकरच निर्णय घेईल.दरम्यान केंद्र शासनाच्या निर्णयानुसार व निकषानुसार महाराष्ट्र राज्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून,बुलढाणा जिल्ह्यातील 86 मंडळात दुष्काळ जाहीर झाला असून,राज्य सरकारच्या वतीने विविध सवलती अनेक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात लागू होणार आहेत.एकंदरीतच दुष्काळी मंडळाच्या घोषणेनंतर, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी,राज्यातील शेतकऱ्यांना,शासनाच्या वतीने विविध सवलती लागू होणार असल्याचे दिसत आहे.