सांगलीतील सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या बेडक कचरा डेपोतील व समडोळी कचरा डेपोतील कार्य, आदर्शात्मक प्रशंसनीय.--सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखळकर.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सांगलीत आज सामाजिक कार्यकर्ते माजी उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर,याचिका कर्ते आर बी शिंदे सर,नागरिक जागृती मंच चे सतीश साखळकर,गजानन साळुंखे,उध्दव ठाकरे गटाचे रुपेश मोकाशी,ऋषिकेश पाटील इत्यादी कार्यकर्ते सां.मि.कु. महानगरपालिकेच्या बेगड कचरा डेपो आणि समडोळी कचरा डेपो ला भेट दिली...तिथे ज्या गोष्टी दिसल्या त्यांची माहिती अशी आहे..!

1)दोन्हीकडच्या कचरा डेपो मधील वर्षोनुवर्षे साठलेल्या पैकी अंदाजे ८०% जुन्या कचर्याचे विलगीकरण करुन झाले आहे..

2)त्यातल्या ओल्या कचऱ्यापासून खत बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे..

3)सुखा प्लॅस्टिक कचर्याचे RDF बनवून सिमेंट कारखान्यात वापर होईल.. 

4)हे सर्व करण्यासाठीची यंत्रणा मोठ्या प्रमाणात बसवलेली आहे.. 

5)ही घनकचरा प्रक्रियेची तांत्रिक बाजू बघुन समाधान वाटते..

6)पुर्वीचे ७६ लाख रुपयांचे दोन सेग्रिगेटर बहुतेक भंगारात गेले असावेत. या नवीन यंत्रणेचे सेग्रिगेटर होऊ नये ही सदिच्छा..

7)या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठीची आर्थिक प्रक्रिया याबाबत वेगवेगळी मतं असु शकतात पण तांत्रिक दृष्ट्या जे सुरू आहे ते आशादायी आहे..

8)दोन्ही कचरा डेपोची ५०% जागेवर आमराई प्रमाणे उद्यान होऊ शकते..

9)राज्यातील व देशातील अनेक नगरपालिका व महानगरपालिकेसाठी हा एक चांगला पथदर्शी प्रकल्प होऊ शकतो..

10)महापालिकेकडून मिळणारा कचर्याचे सुरवातीला विलगीकरण होते.. हलक्या वजनाचे प्लॅस्टिक वेगळे होऊन ते RDF बनवून सिमेंट कारखान्यात वापरासाठी जाते, 

11)मध्यम वजनाचा ओला कचरा वेगळा होऊन तो कंपोस्ट खत बनण्यासाठी वापरला जातो..आणि जास्त वजनाचे दगड व तत्सम प्रकार लॅंडफिल साठी वापरले जाते..

12)सदर घनकचरा व्यवस्थापन बाबत मत मतांतर आहेत टक्केवारीचा आरोप प्रत्यारोप होत राहणार.मात्र जागेवर जावून पाहणी केली असता सध्याचे सुरू असलेले काम आणि तेथील कित्येक वर्षांपासून साठलेला कचरा हटवण्यात आला आहे.

13)आपण आवर्जून पाहण्यासारखे आहे.सदर दोन्ही ठिकाणी गेलो असता दुर्गंधी मुक्त कचरा डेपो निर्माण झाला आहे. अजिबात वास येत नाही.

14)प्लास्टिक युक्त काही कचरा बाहेर भरावासाठी गेलेला म्हणून आरोप होत आहेत त्याची चौकशी करण्यात आली पाहिजे ते चुकीचे आहे.

15)नवीन येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया राबवण्यात येणार आहे ती चांगल्या पद्धतीने होईल अशी अपेक्षा आहे.

आम्ही त्या बाबतीत लक्ष देवून सहकार्य करू,असे नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखळकर यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top