जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त-सोशल मीडिया
देशात आता कोरोना नंतर,चिनी न्युमोनियाचा धोका असल्याने सतर्कतेचा इशारा,केंद्र शासनाने सर्व राज्यांना दिला असून, राज्यांतील सर्व यंत्रणा आता सावध झाल्या आहेत.कोरोना नंतरच्या संभावित चिनी न्युमोनियाचा मध्ये सर्दी,ताप, खोकला,थकवा येणे,घशामध्ये खवखवणे,घसा दुखणे अशीच लक्षणे असून,सध्या तरी देशात किंवा राज्यात कोठेही रुग्ण असल्याचे दिसत नाही,शिवाय चिनी न्युमोनियाचा भीती बाळगण्याचे कारण नाही.
केंद्र शासनाने सर्व राज्यांच्या आरोग्य विभागात यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले असून,त्यानुसार प्रशिक्षित मनुष्यबळ, ऑक्सिजन उपलब्धता,कार्यरत ऑक्सिजन प्लॅंट,व्हेंटिलेटर उपलब्धता,अतिदक्षता विभाग,सुसज्ज प्रतिबंधित यंत्रणेसह रुग्णालये सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.सर्व राज्यांनी औषधांचा पुरेसा साठा,लस,निदानासाठी लागणारे किट्स,इतर आवश्यक साहित्य आदी बाबींवर विशेष लक्ष ठेवून,सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्र शासनाने व सर्व राज्यांच्या शासनानी,प्रतिबंधात्मक खबरदारीचे उपाय म्हणून,नागरिकांनी मास्कचा वापर करावा, गर्दीत जाणे टाळावे,हात वारंवार साबणाने धुवावेत, सॅनिटायझर चा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.देशातील श्वसन यंत्रणेशी संबंधित असणाऱ्या रुग्णांनी,योग्य ती काळजी व खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सध्या तरी चीनच्या ईशान्य भागामध्ये चिनी न्युमोनियाचा उद्रेक असल्याचे दिसत असून,यात विशेषत्वे लहान मुलांचा जास्त प्रमाणात समावेश आहे.एकंदरीतच देशातील नागरिकांनी याबाबतीत योग्य ती काळजी व खबरदारी घेण्याचे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे.