जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
गुजरात मधील अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज,भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक क्रिकेट चा अंतिम सामना होणार असून,देशात सर्व क्रिकेट रसिकांनी भारत विश्वचषक "विजयी भव" अशी इच्छा व्यक्त केली आहे.दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील होणारा अंतिम विश्वचषक क्रिकेट सामना पाहण्यासाठी,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उप प्रधानमंत्री रिजल्ट मार्कल्स हे उपस्थित राहण्याची शक्यता असून,सुरक्षा व्यवस्था अतिशय चोख व कडक करण्यात आलेली आहे.
काल गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी सुरक्षेचा,स्वच्छतेचा,वाहतूक व्यवस्थापनेचा,संपूर्ण आढावा घेतला आहे.आज होणाऱ्या गुजरात मधल्या अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर,भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक अंतिम सामन्याकडे,संपूर्ण देशातील क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.