जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
मुंबईमध्ये सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे मंगळवारी रात्री उशिरा निधन झाले असून,ते अनेक दिवसांपासून आजारी होते.मुंबईमध्ये प्रसिद्ध असलेल्या कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू होते.देशात सहारा इंडिया परिवारचे संस्थापक,व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष म्हणून सुब्रत रॉय यांचे नाव प्रसिद्ध आहे.
सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रत रॉय सहारा श्री या नावाने देशात परिचित होते.सन 1978 साली सहारा इंडिया परिवाराची त्यांनी स्थापना केली असून,सहारा इंडिया उद्योग समूहाचा कारभार त्यांच्या अधिपत्याखाली सुरू होता.देशातील विविध राजकीय पक्षांनी सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रद्राय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून आदरांजली वाहिली आहे.