जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
काँग्रेस भवन सांगली येथे,सांगली जिल्हा काँग्रेस सेवादल, सांगली जिल्हा युवक काँग्रेस,सांगली जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग, व निराधार निराश्रीत विभागाच्या वतीने,काँगेस नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी यांचा वाढदिवस,केक कापून व लाडू वाटून तसेच वृध्दाश्रम येथे उपयोगी वस्तू वाटप करून साजरा करण्यात आला.
यावेळी सांगली जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली.त्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवारांना,जिल्हा परिषद असेल,विधानसभा असेल किंवा लोकसभा यामध्ये काँग्रेसच्या उमेदवारास निवडून आणून,सोनिया गांधींना त्याच्या वाढदिवसाची भेट म्हणून,काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेस उमेदवार विजयी करून देतील.यावेळी बोलताना सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा सांगली जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ.सुशील गोतपागर यांनी,जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती विभाग भक्कम करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्नावरती रान उठवेल.समाजकार्य तसेच इतर शासकीय योजनांच्या बाबतीत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी,आपल्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी यापुढील काळामध्ये बहुमोल कार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले,ओबीसी सेलचे अशोक सिंग राजपूत,जिल्हा युवक काँग्रेसचे व अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुशील गोतपागर,निराधार निराश्रीत सेलच्या प्रदेश सचिव बेबी कांचन खंदारे,प्रदेश काँग्रेस अनुसूचित विभागाचे प्रशांत कांबळे,सांगली शहर जिल्हा अनुसूचित विभागाचे अध्यक्ष विजय आवळे,मनोज कांबळे सांगली शहर चे अध्यक्ष राजेंद्र कांबळे,संजय मोरे, किरण देवकुळे,सूर्यकांत लोंढे,मिलिंद वाघमारे,परशुराम दोरकर,सेवा दलाचे पैगंबर शेख,विक्रम सिंह पाटील,सौ.प्रतीक्षा काळे,सीमा कुलकर्णी,विश्वास यादव,अपंग सेलचे सुरेश गायकवाड,विठ्ठलराव काळे,युनस जमादार,श्रीधर बारटक्के,शिवाजी माळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.