जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील थंडीचा कडाका कमी होण्याची शक्यता असून,राज्यातील किमान तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. सध्या अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्याची स्थिती दक्षिणेकडे सरकली असल्याने,उत्तर भारतातील थंडी कमी झाली आहे. दरम्यान पंजाब मधील अमृतसर,हरियाणा मधील भिवणी, नर्नूल या ठिकाणी सर्वात निश्चांकी तापमानाची म्हणजेच 6.2 अंश सेल्सियस अशी नोंद झाली आहे.
महाराष्ट्र राज्यात सध्या थंडीच्या वातावरणामुळे व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या भय निर्माण झाले आहे.महाराष्ट्र राज्यातील काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडली असून, बऱ्याच जिल्ह्यांच्या ठिकाणी किमान तापमानात बऱ्याच अंशी घट झाली आहे.महाराष्ट्र राज्यातील थंडीचा कडाका कमी होण्याची शक्यता व राज्यातील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवल्यामुळे,सद्य परिस्थितीतील कडाक्याच्या थंडी पासून नागरिकांची सुटका होईल असे वाटते.आजचे राज्यातील धुळ्याचे तापमान 8.5 अंश सेल्सिअस होते.