जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
मध्यप्रदेश,राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या यशाबद्दल तेथील जनतेचे,या यशासाठी प्रयत्न केलेल्या कार्यकर्ते -पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी केले आहे. चारपैकी तीन राज्यामध्ये भाजपची सत्ता आली आहे,या तीनपैकी दोन राज्यामध्ये पूर्वी काँग्रेस ची सत्ता होती,त्या राज्यांमधून काँग्रेसला हद्दपार केले आहे.या निकालातून पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्यावरचा विश्वास आणखी दृढ झाला आहे.तसेच नरेंद्र मोदी हेच देशाचे खंबीरपणे नेतृत्व करू शकतात,यावर शिक्कामोर्तब झालं आहे.लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकलाना देशभरात महत्व प्राप्त झाले होते.देशातील जनतेचे या निकालाकडे लक्ष होते.आणि अपेक्षेप्रमाणे निकाल भाजपच्या बाजूने आले आहेत.देशभरात मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालेली कामे आणि भविष्यातील मोदिजीनी पाहिलेले प्रगत भारताचे स्वप्न यावर जनतेने दाखवलेला हा विश्वास आहे.जगभरातील सर्व देशांशी असलेले मोदीजींचे संबंध आणि त्यामुळे आपल्या देशाची उंचावलेली प्रतिमा,या सुद्धा लोकाना भावलेल्या आहेत.या सर्व बाबींमुळे येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत,भाजप मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा लोकसभा जिंकून सत्तेत येईल यावर मतदारांनी दाखवलेला हा विश्वास आहे हे या निकालावरून दिसून येत आहे.या तिन्ही राज्यांतील विजयासाठी प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह,राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी व तिन्ही राज्यातील प्रमुख नेते मंडळी यांचे,सांगली लोकसभा मतदार संघाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करीत असल्याचे,सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी म्हटले आहे.