जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
कोल्हापूरात काल अवकाळी पावसाच्या ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले असून,गेले 3 दिवसात दुसऱ्यांदा पावसाने कोल्हापूर शहर व परिसराला झोडपले आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून,कसबा बावड्यातही जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान कोल्हापूर शहर सोडून उपनगरात पाऊस नसल्याचे चित्र आहे.कोल्हापुरात आज झालेल्या पावसानंतर काही ठिकाणी,इंद्रधनुष्य प्रकटल्याचे समोर दिसून आले आहे.गेले 3 दिवस चालू असलेल्या कोल्हापूर शहरातील पावसामुळे,ऊस गळीत हंगामावर परिणाम होत असल्याचे दिसून आले असून, फळबागाच्या शेतीवर फार मोठा परिणाम झाला आहे.