जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
दिल्ली येथे आज केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी भेट घेऊन,जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली.यावेळी सांगली जिल्ह्यातील सलगरे येथे प्रस्तावित असणाऱ्या लॉजिस्टिक पार्कच्या कामास चालना मिळावी व सदर लॉजिस्टिक पार्क संबंधी प्रशासकीय बाबी लवकरात लवकर पूर्ण होऊन लॉजिस्टिक पार्क कार्यान्वित करणे बाबत सकारात्मक चर्चा झाली.
तसेच सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन रस्त्यांचा विकास व्हावा व ग्रामीण भागातील दळणवळणास सुलभता यावी यासाठी केंद्रीय रस्ते विकास निधीमधून भरघोस निधी मिळावा अशी मागणी केली.तसेच सांगली जिल्ह्यामध्ये माननीय गडकरी साहेबांच्या व केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाचे जाळे मोठ्या प्रमाणात निर्माण झाले असून सदर महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू झाली आहे. सदर महामार्गावर अपघात झाल्यास लवकरात लवकर आरोग्य सुविधा मिळावी व प्रवाशांचा जीव वाचावा या उद्देशाने रस्ते विकास व महामार्ग मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या ट्रामा सेंटर (हॉस्पिटल) सांगली जिल्ह्यामध्ये मंजूर करावे अशी मागणी केली व सकारात्मक चर्चा केली मा.गडकरी साहेबांनी वरील सर्व मागण्या त्वरित पूर्ण करू असे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना खासदार संजय काका पाटील यांनी सांगितले की सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरि प्रयत्न करीत असल्याचे व विकास कामासाठी अहोरात्र बांधील असल्याचे त्यांनी सांगितले.