जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
यंदाच्या वर्षीचा मराठी भाषेसाठी असणारा साहित्य अकादमीचा पुरस्कार,कोल्हापूरच्या श्री.कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला जाहीर झाला आहे.कोल्हापूरच्या कृष्णात खोत यांच्या रिंगण कादंबरीत,विस्थापितांच्या जीवनाचे संपूर्ण चित्र प्रतिबिंबित झाले असून,यंदाच्या वर्षीचा मराठी भाषेसाठी असणारा साहित्य अकादमीचा अत्यंत प्रतिष्ठेचा असणारा पुरस्कार,कोल्हापूरच्या कृष्णात खोत यांनी पटकावला आहे.
मराठी भाषेसाठी असणारा साहित्य अकादमीच्या पुरस्कारामध्ये,मानपत्र,शाल,श्रीफळ व रुपये 100,000/- असा समावेश आहे.त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षीचा कोकणी भाषेसाठी असणारा पुरस्कार,वर्सल या लघुकथेच मिळाला असून,लेखक प्रकाश पर्येंकार आहेत.
कोल्हापूरच्या कृष्णात खोत यांची रिंगाण ही कादंबरी फार गाजलेली असून,विस्थापितांच्या जीवनावर संपूर्ण कथा प्रतिबिंबित झाली आहे.यंदाच्या वर्षीचा मराठी भाषेसाठी असणारा साहित्य अकादमी पुरस्कार कोल्हापूरच्या कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला मिळाल्यामुळे,त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.