महाराष्ट्र राज्यातील कोयना धरण परिसरात 3.1 रिस्टर स्केल चा भूकंपाचा सौम्य धक्का,कोयना धरणास धोका नाही.-- कोयना धरण व्यवस्थापन प्रशासन.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

महाराष्ट्र राज्यातील कोयना धरण परिसरात काल भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून,त्याची तीव्रता 3.1 रिस्टर स्केल इतकी आहे.काल सायंकाळी 5 वाजून 06 मिनिटांनी कोयना धरण परिसरात हा भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून, कोयना धरणास कोणताही धोका नसल्याचे स्पष्टीकरण कोयना धरण व्यवस्थापन प्रशासन दिले आहे. 

काल झालेल्या भूकंपाची तीव्रता 3.1 रिस्टर स्केल इतकी असून,भूकंपाचा केंद्रबिंदू हा कोयनानगर पासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या हेळवाक या गावाच्या नैऋत्येला 6 किलोमीटरवर आहे.दरम्यान पाटण तालुक्यातही आसपासच्या परिसरात भूकंप जाणवला असून,तेथे कोठेही पडझड झाल्याचे वृत्त नाही.सदरहू भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगर पासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या हेळवाक गावाच्या नैऋत्येला 6 किलोमीटरवर असून,भूकंपाची खोली ही जवळपास जमिनीखाली 9 किलोमीटर असल्याची माहिती झाली आहे. 

कालचा झालेला भूकंपाचा सौम्य धक्का हा फक्त कोयना धरण व आसपासच्या परिसरातच जाणवला असून,त्यामुळे कोठेही जीवित व वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top