जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज ऐतिहासिक निकाल दिला असून,शिवसेना शिंदे गट ही मूळ शिवसेना असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे.त्याबरोबरच शिवसेना शिंदे गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत.गेले काही दिवस महाराष्ट्र राज्यातील राजकीय अस्थैर्य लक्षात घेता,महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल हा महत्त्वाचा म्हणावा लागेल.शिवसेना उद्धव ठाकरे गट मात्र या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असून,महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना धक्कादायक आहे.
दरम्यान यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे सह अन्य 16 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल झाली होती.महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतते प्रकरणी,1999 ची पक्षघटना ग्राह्य धरली असून,2018 साली केलेली घटना दुरुस्ती ग्राह्य धरली नाही.महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती वैद्य केली असून,गटनेते म्हणून एकनाथराव शिंदे यांची निवड वैध ठरवली आहे.शिवसेना ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांना कोणतीही बैठक बोलण्याचा अधिकार नसून,शिंदे गटाच्या सदस्यांना अपात्र ठरवता येणार नाही असे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात,उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याची संधी असून,तिथे त्यांना निश्चितच न्याय मिळेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. मूळ शिवसेना ही शिंदे गटाची कधीच होऊ शकत नसून, शिवसेनेशी त्यांचा संबंध संपला आहे.सर्वोच्च न्यायालयाचे नियमही धाब्यावर बसवले असून,मूळ शिवसेना ही आमची असल्याचे मत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.एकंदरीतच महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर आता,गेले दीड वर्ष चाललेले राजकीय नाट्य संपुष्टात आले असून,आता याचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत राहील असे दिसत आहे.