जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त:-सोशल मीडिया
आसाम मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी व कन्हैयाकुमार यांच्या विरोधा एफ.आय.आर .दाखल झाल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली असून,आसाम शासन आणि राहुल गांधी यांच्यामधील संघर्ष आता वाढण्याची शक्यता आहे.
भारत जोडो न्याय यात्रेला परवानगी न देण्याची भूमिका असाम सरकारने घेतली असून,असाम सरकारचे आव्हान आता राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी स्वीकारले असल्याचे स्पष्ट झाले आहे.आसाममध्ये मंगळवारी सकाळी पोलीस प्रशासना बरोबर झालेल्या झटापटीनंतर लागलीच काँग्रेस नेते राहुल गांधी,के.सी.वेणुगोपाल,कन्हैयाकुमार यांच्याविरुद्ध एफ.आय.आर. दाखल करण्यात आल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली असून,काँग्रेस नेते राहुल गांधी,के.सी.वेणुगोपाल, कन्हैयाकुमार आणि इतर लोकांविरुद्ध कलम 120( बी),143/ 147/ 188/ 283/ 427 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
याशिवाय कलम 353,कलम 332,कलम 333 अन्वये देखील अजामीन पात्राचे गुन्हे देखील दाखल झाले असल्याच्या माहितीचे वृत्त आहे.एकंदरीत आसाममध्ये सुरू असलेल्या भारत जोडो न्यायात्रेला परवानगी नाकारलेचे,आसाम सरकारच्या भूमिकेचे पुढे काय होते ? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.