सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व पाणी आणण्याच्या योजनांचे जनक आमदार अनिल भाऊ बाबर यांचे दुःखद निधन.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सांगली जिल्ह्यातील आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व पाणी आणण्याच्या योजनांचे जनक आमदार अनिल भाऊ बाबर यांचे आज वयाच्या 74 व्या वर्षी,उषःकाल हॉस्पिटलमध्ये निमोनियाच्या आजाराने आकस्मित निधन झाले आहे. 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे ते घनिष्ठ सहकारी होते.आमदार अनिल भाऊ बाबर हे एक पाणी आणणाऱ्या योजनांचे जनक म्हणून लोकप्रिय झाले होते. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आमदार अनिल भाऊ बाबर यांनी,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा सर्वप्रथम निर्णय घेतला होता व महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त करून,खंबीरपणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना पाठिंबा दिला होता. 

 खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर हे 2019 साली,शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते व त्यांनी त्यावेळी अपक्ष आमदार सदाशिवराव पाटील यांचा पराभव केला होता.खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल भाऊ बाबर हे 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.सन 1990,1999,2014 व 2019 मध्ये त्यांनी 4 वेळा आमदार म्हणून खानापूर आटपाडी मतदारसंघाचे नेतृत्व केले होते.लोकप्रिय आमदार अनिल भाऊ बाबर यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झालेला असून,वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला.सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार म्हणून आमदार अनिल भाऊ बाबर यांचे नाव विशेषत्वाने, जिल्ह्याच्या राजकारणात आदराने घ्यावे लागेल.खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या आकस्मित निधनाने संपूर्ण जिल्ह्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top