जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
मराठी पत्रकारितेचे जनक, आद्यपत्रकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात दि.06 जानेवारी 1832 रोजी करुन,मराठी वृत्तपत्राची मुहुर्तमेढ रोवली.मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून,मराठी पत्रकारितेला निर्भिड,निष्पक्ष,लोकाभिमुखतेचा वारसा देणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला त्रिवार वंदन.
आपल्या सामाजिक कार्यकाळात बाळशास्त्री यांनी सार्वजनिक गंथालयांचे महत्त्व ओळखून 'बॉंबे नेटिव्ह जनरल लायब्ररी' या ग्रंथालयाची स्थापना केली.तसेच मराठी पत्रकारितेचा पाया भक्कम पणे रोवण्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.!
मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी,वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रथम मान मिळवणारे,ज्येष्ठ पत्रकार म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर.!आपल्या कार्यकाळात विविध प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून त्यांनी कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध ही लिहिले आहेत.!
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.!!
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्कच्या वतीने,सर्व पत्रकार बंधू भगिनींना,पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!-