जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्रातील रयतेचे दुःख दूर करणाऱ्या छ.शिवबांनी श्रीरामांचा आदर्श ठेवला आणि स्वराज्य म्हणजे रामराज्य स्थापन केले.या कामी जिजाऊनी त्यांना प्रेरणा दिली. श्रीरामांनी भारतभूमीला स्वर्ग बनवले.युवा पिढीने आता श्रीराम व छ.शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन कर्तबगारी सिध्द करावी.श्रीराम सर्व भारतीयांचे आहेत.असे प्रतिपादन भागवताचार्य ह.भ.प.योगेश्वरी उपासनी महाराजानी केले.सांगली येथील कल्पद्रुम क्रिडांगणावर डॉ.पतंगराव कदम फौंडेशन व पृथ्वीराज पाटील फौंडेशन यांचे वतीने आयोजित श्रीराम भक्ती उत्सवात ते बोलत होते.
उत्सवाच्या सहाव्या दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भागवताचार्य ह.भ.प. उपासनी महाराजांचे श्रीराम कीर्तन झाले.त्यांनी कीर्तनात छ. शिवाजी महाराजांच्या पोवाड्यातून छ. शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि राजमाता जिजाऊंची थोरवी सांगताना श्रीरामांच्या मानवतावादी कार्याची प्रेरणा स्वराज्य स्थापनेत आहे असे सांगितले.
युवा वर्गाने आईचे उपकार विसरता कामा नये..एका वाईट माणसामुळे संपूर्ण समाजाला दोष देऊ नये..स्व.गुलाबराव पाटील व स्व.डॉ.पतंगराव कदम यांनी खूप मोठे कार्य केले आहे.त्यांना अभिवादन करतो.पृथ्वीराजबाबा पाटील व डॉ. विश्वजीत कदम फौंडेशननी सांगलीत अयोध्येच्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभी करुन खरा श्रीराम भक्तीचा उत्सव साजरा केला आहे असे गौरवोद्गार उपासनी महाराजांनी काढले.
यावेळी भागवताचार्य उपासनी महाराज व कीर्तन कलाकारांचा सत्कार करण्यात आला.तसेच भाग्यवान अयोध्या यात्रेकरू लकी ड्रॉ सोडत उपासनी महाराज,मनोहर व गोपाळ सारडा, हुल्याळकर मामा,अजित पवार, बी.ए.पाटील व पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते काढण्यात आली. सोडत काढणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
प्रा.एन.डी.बिरनाळे यांनी भागवताचार्य उपासनी महाराज व कलाकारांचा परिचय करुन दिला व आभार मानले.यावेळी मनोहर व गोपाळ सारडा,अजित पवार बेनाडीकर,गजानन मिरजे,गजानन मगदूम कुपवाड,लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शांतीनाथ कांते,सिव्हिल सर्जन डॉ.विक्रम कदम, प्रशांत पा.पाटील यशवंतनगर,बजरंग पाटील बुधगाव, सौ. नीता केळकर,राजेंद्र नांद्रेकर जयसिंगपूर,बाळासाहेब ठाकरे व वैभव गुरव कवठेमहांकाळ,एन.एम.हुल्याळकर,सरपंच शुभम उपाध्ये माधवनगर,बी.ए.पाटील,महावीर पाटील नांद्रे,श्री. मेहता, प्रशांत देशमुख,आशिष चौधरी,प्रतिक पाटील व हजारोंच्या संख्येने रामभक्त उपस्थित होते.आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.