जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात संजय गांधी निराधार समितीची बैठक समितीचे अध्यक्ष झाकीरहुसेन भालदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीमध्ये एकूण 833 प्रस्तावाची छाननी होऊन,616 प्रकरणे मंजूर करण्यात आली.तसेच 217 प्रस्तावात त्रुटी असून 8 दिवसात संबंधित गावच्या तलाठ्यामार्फत त्रुटी पूर्तता करून,पुढील मीटिंगमध्ये मंजुरी देण्याचे ठरले.तसेच समस्या निराकरण आढावा बैठकीत,आलेल्या तक्रारदार लाभार्थ्यांचे तक्रार निरसन 4 दिवसात करून,लाभार्थ्यांना कळविण्याची ठरले.
यावेळी तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे,समितीचे सदस्य सर्वश्री महेंद्र शिंदे,संजय देसाई,अमोल गावडे तानाजी ढाले, सुदाम इंगवले,बाळासाहेब गायकवाड,दौलत पाटील,संदेश भोसले,सौ.कविता सूर्यवंशी उपस्थित होते.