भारतीय जनता पार्टीच्या दुसऱ्या यादीत,महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,रावसाहेब दानवे,पंकजा मुंडे,सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 20 जणांच्या लोकसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब.!---

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

भारतीय जनता पार्टीने काल,देशातील लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून,त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,रावसाहेब दानवे, पंकजाताई मुंडे,सुधीर मुनगंटीवार यांचे सह 20 जणांची नांवे समाविष्ट आहेत.

धुळ्यामधून डॉ.सुभाष भामरे,जळगाव मधून स्मिता उदय वाघ,नंदुरबार मधून डॉ.हिना गावित,रावेर मधून रक्षा खडसे,अकोल्यामधून अनुप धोत्रे,वर्धा मधून रामदास तडस,नागपूर मधून नितीन गडकरी,चंद्रपूर मधून सुधीर मुनगंटीवार,नांदेड मधून प्रतापराव पाटील- चिखलीकर,जालन्या मधून रावसाहेब दानवे,दिंडोरी मधून डॉ.भारती पवार,भिवंडी मधून कपिल पाटील,मुंबई उत्तर मधून पियुष गोयल,मुंबई उत्तर- पूर्व मधून मिहीर कोटेचा, पुण्यामधून मुरलीधर मोहोळ,नगर मधून डॉ.सुजय राधाकृष्ण विखे- पाटील,बीडमधून पंकजा मुंडे,लातूर मधून सुधाकर शृंगारे,माढ्यामधून रणजीत सिंह नाईक- निंबाळकर व सांगली मधून संजय काका पाटील यांचा समावेश आहे.

 भारतीय जनता पार्टीने काल देशातील लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची दुसरी जाहीर केली असून,11 राज्यातून 72 उमेदवारांची नावे जाहीर केली असून,त्यामध्ये महाराष्ट्रातील 20,कर्नाटकातील 20,गुजरात मधील 7, तेलंगणा मधील 6,हरियाणा मधील 6,मध्य प्रदेश मधील 5, दिल्लीतील 2,उत्तराखंड मधील 2, हिमाचल प्रदेशातील 2, त्रिपुरातील 1,दादर नगर हवेलीतील 1 अशा 72 उमेदवारांचा समावेश आहे. 

काल जाहीर झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या दुसऱ्या यादीत उमेदवारांमध्ये काही विद्यमान खासदारांना,तर काही नवोदितांना उमेदवारी देण्यात आली असून,काहीना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.एकंदरीतच भारतीय जनता पार्टीने देशातील लोकसभा उमेदवारांची नावे घोषित करून,आघाडी घेतली आहे असे म्हणावयास हरकत नाही.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top