आरोग्य भाग- 47.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
डोक्यावर सूर्य तापला,उष्णता वाढली की एक नवीन त्रास सुरु होतो.तो म्हणजे उन्हाळी लागणे.उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे आणि त्याचबरोबर जळजळ, मुत्रानालीकेत दाह व काहीवेळा रक्त जाणे.हा त्रास मुख्यत्वे उन्हाळ्यात उद्भवतो.अशावेळी लघवी गढूळ होते किंवा रक्तामुळे ती लालसर तपकिरी असतेआपण बघणार आहोत उन्हाळी लागण्याची करणे आणि त्यावरचे घरघुती उपाय.
कारणे !
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कामी होतं. पाणी कमी झाल्याने लघवीत क्षारचं प्रमाण वाढतं.म्हणजेच शरीरात पाणी नसल्याने ‘उन्हाळी लागते’. स्त्री आणि पुरुषांमध्ये हा त्रास वेगवेगळ्या प्रकारे असतो.पुरुषांमध्ये लघवीला व मुत्रानालीकेत आणि जळजळ व आग होण्यासारखी लक्षणे दिसतात तर स्त्रियांमध्ये हीच लक्षणे काही प्रमाणात तीव्र असतात.स्त्रियांना लघवीला जळजळ होण्याबरोबरच कळ येणे आणि रक्तस्त्रावाचा त्रास होतो. यापासून लहान मुलंही वाचलेली नाहीत .
या समस्येवर काही घरघुती उपाय आहेत.चला तर मग जाणून घेऊया...
उपाय.
१. पहिला आणि मुख्य उपाय म्हणजे ‘भरपूर पाणी प्या.’
२. खाण्याचा सोडा आणि लिंबू पाण्यात मिसळून प्यायल्यास त्रास कमी होतो.
३. शहाळ्याचे पाणी प्या.
४. धने जिरे,बडीशेप भिजवून,कुस्करून त्यांना पाण्यात मिसळा व त्यात खडीसाखर घालून प्यावे.
५. कलिंगडचा रस प्या.
६. नारळाच्या पाण्यात धने व गूळ घालून प्या.
७. नीरा प्यायलाने देखील फायदा होतो.
८. आमसुलाचे पाणी,कोकम सरबत साखर घालून प्यावे.
९. कैरीचे पन्हे वेलदोडा घालून प्यावे.
१०. पुदिन्याचे पाणी प्या !!
११ रोज दोन विलायच्या खाव्यात.
१२.. चूना ओला करून.तो बेंबित भरा.लगेच आराम मिळतो.
१३.एका बादलीत थंड पाणी भरून मग त्यात पाय सोडून बसा.
हा लेख सुनिता सहस्रबुद्धे यांचा असून,आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशनचे श्री.संतोष सावंत यांचे कडून संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.