जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
काल जागतिक ग्राहक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक संरक्षण समिती शरदचंद्र पवार पक्षाची महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबई याठिकाणी प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ग्राहक संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष मा.सूर्यकांत गवळी यांच्या प्रमुख उपस्थित आढावा बैठक पार पडली.
देशात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना याबाबत सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.सूर्यकांत गवळी यांना सांगली शहर जिल्ह्याचा आढावा सादर करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईच्या विभाग अध्यक्षा मा.राखीताई जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.16 मार्च रोजी मुंबईत येणाऱ्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभेची तसेच रॅलीची संपूर्ण जबाबदारी ही राखीताईकडे असून सर्वांना सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक संरक्षण समिती शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष तसेच प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.