जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापूर जिल्ह्यात पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन,पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी केले आहे.कारण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी व काळमावाडी धरणातील पाणीसाठा मे महिन्यापर्यंत पुरेल इतकाच असल्याने नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
कोल्हापूर पाटबंधारे विभागामार्फत पाण्याचे उन्हाळ्यात, योग्य ते प्रशासनिक नियोजन करण्यात येणार असून,सध्या परिस्थितीत उन्हाळा हा वाढत जाणार असल्याने, पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.त्यामुळे यापुढील काळात पाटबंधारे विभागाला आवश्यकतेनुसार पुढील महिन्यापासून,उपसाबंदी करावी लागेल असे वाटत आहे.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 51.43% व काळमावाडी धरणा 44.21 टक्के इतकाच पाणीसाठा असून,त्यामुळे कोल्हापुरातील नागरिकांनी या पुढील काळात पाण्याचा वापर काटकसरीने करून,पाटबंधारे विभागास व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी केले आहे.