जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगरावर दख्खनचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्योतिबा देवाच्या चैत्रयात्री पौर्णिमेस,लाखोंच्या संख्येने भक्त- भाविक हजर झाले आहेत. देशाच्या,कर्नाटकच्या व महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 5 लाखांच्या वरती भक्त- भावीक काल ज्योतिबा डोंगरावर हजर झाले असून, ज्योतिबा देवाच्या नावानं चांगभलं असा गजर करीत, गुलालाची गुलाबी उधळण करीत,देवाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल होत आहेत.
ज्योतिबा डोंगरावर ज्योतिबा देवाच्या चैत्रयात्रेचा पारंपारिक रीतीने तीन दिवसाचा उत्सव चालू असून,दख्खनचा राजा असलेल्या ज्योतिबा देवाच्या मंदिरात आज यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे 3:00 वाजता घंटानाद,काकड आरती, पाद्यपूजा,मुखमार्जन,सकाळी ठीक 5:00 वाजता महाअभिषेक,महापूजा,10:00 वाजता धुपारती व सायंकाळी 5:30 वाजता पालखी सोहळा झाला आहे.
दख्खनचा राजा असलेल्या श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर तिकडे पहावे तिकडे गुलाबाची उधळण होताना दिसत होती. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते आज ज्योतिबा देवाच्या मानाच्या शासनकाठीचे पूजन पार पडले असून,मानाच्या सासनकाठीच्या मिरवणूक सोहळ्यास देवस्थान कमिटीचे म्हालदार- चोपदारांसह भक्त- भावीक हजर होते.