जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांच्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे सोडून राज्यात इतरत्र वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.नागपूर, यवतमाळ,वर्धा,अमरावती,आदी जिल्ह्यांना वादळीवाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्यातील पालघर,परभणी,हिंगोली,जालना,सातारा,कोल्हापूर, सांगली,पुणे,नगर आदी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नसून,राज्यातील इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी वादळीवारे पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेचा कहर झाला असून,मागच्या वर्षी पेक्षा यंदाच्या वर्षी तापमानात बऱ्याच अंशी वाढ झाली आहे.महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनी उष्माघातापासून सावध राहावे असा इशारा तज्ञांनी दिला आहे.महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनी दुपारच्या वेळी कामासाठी बाहेर जाण्याचे शक्यतो करून टाळावे असे आवाहन आरोग्य तज्ञांनी केले आहे.