दत्तात्रेय जयंती भाग -१
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
दत्ताचे प्रमुख प्रथम अवतार हे परम गुरु श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरे अवतार परमगुरु श्री नृसिंह सरस्वती यांचे नंतर श्री माणिकप्रभु,श्री स्वामी समर्थ,श्री साईबाबा,श्री भालचंद्र महाराज हे होत.
दत्तात्रेयांचे प्रथम अवतार परमगुरु श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार असून, त्यांनी पंधराव्या शतकात महाराष्ट्रात दत्तोपासना सुरू केली. दत्तात्रेयांचा पहिला अवतार परमगुरु श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय स्वामी यांचा जन्म गणेश चतुर्थीच्या दिवशी पिठापूर येथे झाला असून, आपल्या अवतार कार्याची समाप्ती म्हणजेच निजानंदी गमन दिन त्यांनी गुरुद्वादशीस श्रीक्षेत्र कुरवपूर येथे केली.
श्री नृसिंह सरस्वती हा दत्ताचा दुसरा अवतार असून, श्री गुरुचरित्रात श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांची विस्तृत माहिती आहे.दत्तात्रेयांच्या १६ अंशअंशात्मक अवतारांमध्ये योगिराज,अत्रिवरद,दत्तात्रेय, कालाग्निशमन, योगिजनवल्लभ, लीलाविश्वंभर, सिद्धराज,ज्ञानसागर, विश्वंभर,मायामुक्त,श्रीमायामुक्त,आदिगुरु,शिवरूप,देवदेव, दिगंबर,कृष्णश्यामकमलनयन,हे दत्तात्रेयांचे १६ अवतार अंशअंशात्मक होते.