जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात आज भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ नेतेपदी अखेर देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज सायंकाळी ठीक 5:30 वाजता ते शपथ घेणार आहेत.त्यांचेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.त्याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षाचे नेते (शिंदे गट)एकनाथराव शिंदे हे सुद्धा शपथ घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आज सायंकाळी 5:30 वाजता आझाद मैदानावर होणाऱ्या महायुतीच्या ऐतिहासिक शपथ सोहळ्यास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे इतर राज्यातील मुख्यमंत्री व पक्षातील वरिष्ठ नेते,सन्माननीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.काल झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदीच्या निवड करतेवेळी भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय निरीक्षक म्हणून,केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे हजर होते.आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्याचा ऐतिहासिक महायुतीचा सत्ता स्थापनेचा सोहळा नेत्रदीपक ठरणार व होणार असल्याचे दिसत आहे .