भारतीय विविधता दाखवणारी रजत एज्युकेशन सोसायटीचे "भारत की झॉंकी" स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

प्रतिनिधी -वैशाली कंगणे.

भारत देशाची संस्कृती जगामध्ये महान आहे.भारत देश हा विविधतेने नटलेला आहे.भारतातील 28 राज्यांची भौगोलिक परिस्थिती,इतिहास,पोशाख,खाद्य संस्कृती ही तितकीच वेगळी आहे.या सर्व बाबींची माहिती विद्यार्थी पालक तसेच समाजाला व्हावी हा उद्देश समोर ठेवून रजत ने "भारत की झॉंकी" या विषयावर आपले सन 2024 - 25 चे गॅदरिंग मोठ्या उत्साहाने पार पाडले.

अगदी लहान गटापासून ते इयत्ता 9 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गीतांवर ताल धरला.या गॅदरिंग मध्ये छ.संभाजी महाराज यांच्या जीवनावरील नाटक तसेच कांतारा,अघोरी गाण्यांनी पालक व प्रेक्षकांचे मन जिंकले. आई - वडील,काका - काकी,आजी - आजोबा यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणारी प्री - प्रायमरीच्या बालचमुनी गाणी सादर केली.एकूणच काय रजत एज्युकेशन सोसायटीच्या या वर्षीच्या गॅदरिंगने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. नेहमीप्रमाणे रजत एज्युकेशन सोसायटीचे गॅदरिंग अजरामर असेच ठरले.

या कार्यक्रमासाठी मा.राजू आवळे साहेब माजी आमदार तसेच रजत एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार समिती सदस्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी आमदार राजू आवळे यांनी रजतच्या गॅदरिंगचे भरभरून कौतुक केले.संस्थेचे अध्यक्ष दीपक गाट यांनी मनोगत व्यक्त केले.प्रिन्सिपल श्रुती सहस्रबुद्धे यांनी वार्षिक अहवाल सादर केला.

या कार्यक्रमास संस्थेचे सेक्रेटरी प्रकाश चिटणीस,संचालक अमोल गाट,सुनील व्ही.गाट,अजित मडके,देवयानी माळी उपस्थित होते.शिवाय पालक विद्यार्थी व इतर सर्वच लोकांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्पिता देसाई व सौ.वैशाली गुरव यांनी केले.स्वागत प्रास्ताविक गॅदरिंगचे हेड किशोर माणकापुरे यांनी केले.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top