जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(प्रतिनिधी-वैशाली कंगने)
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हुपरी येथे भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न झाली.या स्पर्धा शालेय स्तरावर दोन गटात घेण्यात आल्या. इयत्ता 5 वी ते 7 वी व 8 वी ते 10 वी अशां दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला मुला-मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्पर्धेचे नियोजन भिमराव संघमित्रा,पांडूरंग मानकापुरे,मंगेश मैत्रेय,यांनी केले होते.
यावेळी सुधाकर कांबळे,नानासो कांबळे,डॉ.स्वप्नील हुपरीकर,मोहन टेलर,वंदन कांबळे,शिंदे सर,श्रीकांत हुपरीकर,सुरेश सिद्धार्थ,गुलाब मधाळे,निलेश कांबळे,रमेश कांबळे,तसेच बुद्धविहार प्रतिष्ठान डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.