जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
प्रतिनिधी: (मिलिंद पाटील.)
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय विभागामध्ये एस. आर.ट्रस्ट व अल्मिको यांच्या सहयोगातून आज दि.१९ मे २०२५ ते ०३ जून २०२५ अखेरपर्यंत दिव्यांगासाठी मोफत कृत्रिम हात व पाय यांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज पासून चालू होणाऱ्या तालुकास्तरीय शिबिरामध्ये दिव्यांगासाठी मोफत कृत्रिम हात व पाय,स्प्लिट,कॅलिपर्स मोजमाप व तात्काळ ऑन द स्पॉट बसवण्यात येणार असून आज आजरा हायस्कूल आजरा येथे याची सुरुवात करण्यात आली आहे.या शिबीराची सुरुवात दि.१९ मे पासून सुरू होऊन दि.३ जून रोजी शिरोळमध्ये याची सांगता होणार आहे.
दिव्यांगासाठी मोफत शिबिराच्या तालुकास्तरीय कॅम्पचा तपशील पुढीलप्रमाणे...
तालुका. शिबिराचा दिनांक.. आजरा. १९/०५/२०२५
भुदरगड. २०/०५/२०२५
गडहिंग्लज. २१/०५/२०२५
गगनबावडा. २२/०५/२०२५
हातकणंगले. २६/०५/२०२५
कागल. २७/०५/२०२५
करवीर. २८/०५/२०२५
पन्हाळा. २९/०५/२०२५
राधानगरी. ३०/०५/२०२५
शाहूवाडी. ०२/०६/२०२५
शिरोळ. ०३/०६/२०२५
वरील प्रमाणे सर्व १२ तालुक्यांमध्ये दिव्यांगासाठी हा शिबिर संपन्न होत असून जास्तीत जास्त दिव्यांगानी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन एस.आर.ट्रस्ट एलिमको व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.